
शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय, चंद्रपूर इथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग द्वारा “एक पेड माँ के नाम” या प्रेरणादायी उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम दि.4 ऑगस्ट 2025 रोजी उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एजाज शेख, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी नंदकिशोर भंडारी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एजाज शेख, यांनी स्वयंसेवक व विद्यार्थ्यांना वृक्षांचे पर्यावरणीय आणि सामाजिक महत्त्व पटवून दिले व भावी पिढ्यांसाठी निसर्गसंवर्धनाचे भान जपण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाची खास गोष्ट म्हणजे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डॉ.एजाज शेख पर्यावरणाप्रती असलेली त्यांची वचनबद्धता दाखवून स्वतःच्या हातांनी विविध प्रकारांचे झाडे लावली. ह्या समइ सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठया संख्येने उपस्थित अस्थाना हि मोहीम आणखी आकर्षक आणि प्रेरणादायी बनली.
हा वृक्षारोपण कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एजाज शेख ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले.












