
अमोल भालेराव सह संदीप अवधुत, वणी प्रतिनिधी – दिनांक ७ ऑगस्ट रोजी सामाजिक वनीकरण दिंडोरी व ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज दिंडोरी यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे”वृक्षबंधन व वृक्ष रोपणाचा कार्यक्रम कृष्णगाव रोपवाटिका सामाजिक वनीकरण दिंडोरी येथे साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीम. ऋतुजा लटके सहाय्यक वनसंरक्षक सामाजिक वनीकरण नाशिक (2) यांनी वृक्षबंधन व वृक्षरोपण कार्यक्रमाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यात वन कर्मचारी यांचे प्रति आदर प्रेम श्रद्धा व्यक्त करण्याकरिता विद्यार्थ्यांनी राखी बांधून वृक्षरोपण व वृक्ष बंधना चा कार्यक्रम देखील साजरा केला.या कार्यक्रमासाठी सहाय्यक वनसंरक्षक ऋतुजा लटके , ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल ज्युनिअर कॉलेज च्या प्राध्यापिका श्रीम.डिंपलजीं व त्यांचे कर्मचारी, तसेच वनक्षेत्रपाल वसंत पाटील, श्रीम. मानसी पाटील, व वनपाल, पवार, डांगे,महाले, वनरक्षक बागुल, चौधरी,भोये, डाटाऑपरेटर जावेद शेख मंडलिक बोके, वाळू जाधव आणि कळवण (सा व) व दिंडोरी (प्रा.) येथील वन कर्मचारी उपस्थित होते..
सदर कार्यक्रमाची विद्यार्थ्यांकडून वनाधिकारी वन कर्मचारी यांना ग्रीटिंग कार्ड देऊन सांगता करण्यात आली..















