
वनानथ उल्हारे कोपरगाव शहर प्रतिनिधी 7744022677 – कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे आज जागतिक आदिवासी दिन मोठे आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. आपला वारसा. संस्कृती. व हक्कांचे रक्षण करून एकतेने पुढे जाऊया. या अनुषंगाने 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमासाठी गावातील एकलव्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा बँकेचे सदस्य अशोक माळी यांच्या हस्ते प्रतिमेची पूजा विधि करण्यात आली. व कोपरगाव येथे तालुक्याचे माजी आमदार आशुतोष दादा काळे यांनी भगवान एकलव्याचे स्मारक बांधण्यासाठी एक कोटी रुपये मंजूर करून दिले याबद्दल चास नळी तील सर्व ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. हे स्मारक सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल असे बोलताना अशोक माळी यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी भाऊसाहेब माळी सुखदेव माळी बाळासाहेब ठाकरे. कैलास माळी. संतोष हरणे. बलसाने. सोनवणे. भाऊसाहेब चांदगुडे व भीमसैनिक आदी उपस्थित होते.















