prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – “रक्षाबंधन”

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – “रक्षाबंधन”

0
140

पहाटेच्या त्या कोवळ्या किरणात,
बहिणीचा असतो प्रीतिपुर्वक हसरा गंध,
भाऊसाठी त्या नजरेत काळजी,
मनामध्ये असतो राखीचा बंध ||1||

बालपणाच्या आठवणी जिव्हाळ्याच्या,
अश्रूंमधुनी गंध येतो छान,
रुसणं,फुगणं,तरीही मनातून,
असते दोघांचं निरागस नातं महान ||2||

सणासुदीला तिचं वाट पाहणं,
भावाच्या मनात उधळतो आनंद,
निरागस त्या बहिणीच्या नजरेत,
मायेनं भरलेला असतो विश्वबंध ||3||

भाऊ तिच्यासाठी वडिलांसारखा,
भविष्यासाठी झटणारा ध्यास,
तिच्या दुःखाला स्वतःचे समजून,
सावरतो तो प्रत्येक श्वास ||4||

भाऊ-बहिणीचं हे सखोल नातं,
देहभानापलीकडे असते जिव्हाळ्याचं,
राखीच्या दोऱ्यांत गुंफून ठेवलेलं,
सौंदर्य असतं प्रेमाचं आपुलकीचं ||5||

चारुशीला बिडवे
डोंबिवली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here