
एक धागा रेशमाचा
बंधन प्रेमाचा
भावाबहिणीचा नाता
अतूट विश्वासाचा….
प्रेमळ, मायेचे
भाऊ बहिणीचे नाते
रुसवे फुगवे आले
राग क्षणात विसरते…
श्रावणात पौर्णिमेला
असते रक्षाबंधन
लेकी माहेराची ओढ
येता माहेरी आनंदवन….
बहीण करते औक्षण
ओवाळून भाऊराया
भाऊ झाला धन्य
बघून बहिणीची माया….
एक धागा हा राखीचा
भावाच्या हाताला बांधते
प्रेम अन् विश्वास त्यात
सुखी ठेव देवा, मागणी मागते…..
असे नाते प्रेमाचे
भाऊ अन् बहिणीचे
रक्षाबंधन हा सण
प्रेम वाढवी दोघांचे…..
सौ. दिपा भवेश तागडे
अर्जुनी मोरगाव,गोंदिया















