prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे विशेष कविता – रक्षाबंधन

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे विशेष कविता – रक्षाबंधन

0
135

रक्षाबंधन अतूट
रेशीमबंधाचे नाते
प्रेम भाऊ बहिणीचे
मनामनात जपते

रक्ताचे जपू संबंध
असावे युगायुगाचे
प्रेमळ ऋणानुबंध
आहे आयुष्यभराचे

नाते हळवे राखीचे
मानूया जगावेगळे
लाभले हे मजला
जन्मांतराचे सोहळे

भाऊराया पाठीराखा
संकटात सोबतीला
नाते असे प्रेमाने
सदोदित जपायला

सुखदु:खात सामील
रक्षणार्थ दिनरात
रक्त संबंध स्नेहाचे
राहू सदैव सुखात

स्वरचित
गीताश्री अनुपमा पुंडलीक नाईक
मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here