
श्रावण मासी नारळी पौर्णिमा
अर्पण होती श्रीफळ सागराशी
भावा बहिणीचं नातं दृढ होती
बांधीत रेशीम दोरा मनगटाशी
एकीला चार भावांचं बळ
तर एकीला एकही नाही
चार मनगटी चार राख्या
कुणाला एकही नाही
असले जरी भाऊ बहीणीला
थोड्या घरी ही प्रथा नाही
नाही बांधला मनगटी दोरा
प्रेम कमी होणार नाही काही
प्रेम नसावं मृगजळा परी
नसावी त्यात स्वार्थाचीं कणी
पाठीराखा हा भाऊचं असतो
आठवीती सासरी गेलेल्या बहिणी
सुनिता पेडणेकर
गोवा















