
आज आनंदाचा आला सण
देशभर साजरे हो रक्षा बंधन!
बहीण भावाचे होई समाधान
बांधली राखी मनगटात छान!
उभा भाऊ पाठीशी अभिमान
देतो भेट वस्तू कधी मूल्यवान!
कौटुंबिक प्रेमाला आलं उधाण
किती उत्साही झालंय हे मन!
हे बंध रेशमाचे जुळले छान
ताई माझी लाडकी बहीण!
ताईने सकाळी पहाटे उठून
केलंय सडा सारवण छान!
काढली रांगोळी दारी बसून
भरले रंग प्रेमाचे त्याच्यातून!
सुखी कुटुंब आमचे गावातून
आई अन बाबांचे योगदान!
समाजात मोठा मान सन्मान
आजी आजोबांची शिकवण!
एकत्र कुटुंब हे जमले प्रेमानं
साजरे करूया रक्षा बंधन!
विविध पोशाख केलं परिधान
सौंदर्यवती सजल्या हो छान!
आनंद ओसांडतो चेहऱ्यावरून
किती भाग्याचे हो रक्षा बंधन!
घराघरात साजरा होतो सण
गरीब असो की श्रीमंतीतून!
भेटवस्तू देऊ बहिणीला छान
प्रसन्नता दिसेल हो नजरेतून!
तोंड गोड केले कंदीपेढे देऊन
बांधली राखी प्रेमानं ओवाळून
टिपले फोटोत हे आनंदी क्षण
वर्षभर राहील गोड आठवण!
अनमोल सण हो रक्षा बंधन
काढावी दृष्ठ दोघांची छान!
श्री. अशोक महादेव मोहिते
सैनिक,कविवर्य, लेखक
बार्शी, जिल्हा सोलापुर















