
तुझ्या रक्षणाची
जबाबदारी माझी
प्रत्येक संकटाला उभे राहील
जेव्हा हाक येईल तुझी.,.
वचन माझे आहे तुला
निरढावलेल्या दुनियेत
धागा नसला हाती जरी
जपेल मी संविधानात….
कधी आई,कधी पत्नी, कधी लेक,
बहीण,कधी जिवलग मैत्रीण
किती रूप तुझे नारी
सांभाळीन मी नात्याची हीच विण.
हे चंद्र सूर्य तारे
चमकतात नभात ग
हे प्रेमळ नाते रेशमी बंधाचे
राहील आहे हृदयाची धडधड ग..
गायकवाड मनोज रामचंद्र
शहापूर जिल्हा ठाणे.















