prabodhini news logo
Home कल्याण प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे विशेष कविता – रक्षाबंधन

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे विशेष कविता – रक्षाबंधन

0
126

सण रक्षाबंधनाचा,
बंध सांगतो भावार्थ.
खरा धाग्याच्या महिमा,
बहिणीच्या रक्षणार्थ….१

देतो नात्यात गोडवा,
पौर्णिमेचा हाच सण.
भाऊ देतो बहिणीला,
साडी नी चोळीचा खण….२

नाते द्रौपदी कृष्णाचे,
अनमोल अखंडित.
केली परंपरा तिने,
चिंधी कृष्णाला बांधीत….३

कोळी बांधवांचा सण,
देण्या सागरास दान.
करे सुवर्ण नारळ,
कोळी दर्यास प्रदान….४

नाते सख्खे मानलेले,
देतो प्रेमाचा जिव्हाळा.
वेड्या बहिणीची माया,
भाऊ तिच्या मनी भोळा….५

एक राखी सैनिकाला,
करे देशाचे रक्षण.
राखी बांधुनी सैनिका,
चला करूया औक्षण….६

सौ रेखा मालपुरे कल्याण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here