
तुझ्यासाठी भाऊराया
उजळती नेत्र ज्योती
औक्षण करते तुला
राखी पौर्णिमा प्रभाती
तुच पाठीराखा माझा
निश्चिंत आहे मी मनी
कितीही संकटे आली
आनंद माझ्या जीवनी
‘मी आहे’ हे दोन शब्द
देती मज संजीवनी
कठीण परिस्थितीत
तूच नेशील तारुनी
फक्त तुच माझ्या पाठी
असे नाहीरे बरं का
तुझ्या समवेत मीच
हे कधी विसरु नका
शेवटी रक्षाबंधन
म्हणजे काय लक्षात
ठेवावे बंधू भगिनी
आपण दोघे तारीणी
नाते नाही गरजेचे
संकटात लढायचे
हे असेल ज्यांचे तत्व
नर नारी पुजायचे
(स्वरचित)
नीला चित्रे
चिंचवड पुणे















