prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता  – रक्षाबंधन 

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता  – रक्षाबंधन 

0
259

राखीच्या दिवशी बहिणीला देवी म्हणतोस,
आणि गल्लीच्या कोपऱ्यावर
दुसऱ्यांच्या बहिणीकडे लाळ गाळतोस..
घरात बहीण, बाहेर शिकार
ही कसली मर्दानगी रे..?
हा कसला सणाचा साज..?

तुझ्या बहिणीवर वाईट बोललं
तर तलवार उचलतोस,
पण इतरांच्या बहिणीकडे पाहून
वासनेनं का हसतोस..?
बहिण फक्त रक्ताचं नातं नाही,
ती माणुसकीचा श्वास आहे,
स्वाभिमानाची ओळख आहे…

ज्या दिवशी गल्लीतील प्रत्येक मुलगी
तुझ्यासाठी बहीण बनेल,
त्या दिवशी बलात्कार हा शब्द
फक्त इतिहासात उरेल..
राखीचं वचन हातात नाही,
तर नजरेत बांध, आणि मनात रोव…

नाहीतर तुझ्या राख्या फासाच ठरतील,
आणि तुझं पुरुषत्व
फक्त विकृतीचं पुरावा बनेल..
बहिणीचं रक्षण पोलिसांनी नाही,
तर तुझ्या विचारांनी व्हायला हवं..
नाहीतर राखीच्या दोऱ्यांनी
तुझंही मन दोरखंडासारखं घट्ट बांधून टाकेन…!

 चक्रनारायण किशोर
(विद्रोही कवी)
श्रीरामपूर, अहिल्यानगर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here