
कोमल मृदू रेशीम धागा
गुंफला धाग्यात अतूट नाता
सुख नात्याचे अनुभवाला
जन्म अभिलाषी विधाता…१
पवित्र सण रक्षाबंधन
निश्चल विश्वासू प्रेमाचा
रक्षिले द्रौपदी वस्त्रहरणे
करता धावा श्री नामाचा…२
बंधू वडील मित्र तिचा
बंधू हक्काचा आधार
जरी विश्व परकं तिला
स्वागत करती माहेर द्वार…३
सुखात सुखे दुःखात दुखे
बहिण भावाची ती माय
भाव पाठी झुंजार बागन
कधी साय गरीब गाय…४
धागा अमूल्य सुरक्षेतेचा
जोपर्यंत श्वासाची साथ
चंद्र सूर्य जोपर्यंत गगनी
अजरामर बंधू बहिणीचं नातं..५
स्वरचित
सचिन राम ठोंबरे
कलोते खालापूर रायगड















