
राखी बांधते सुबक
भावाच्या हातावर.
माझ्या भावाचे हात
करारी नि कणखर.
शिक्षणाचा घेऊन वसा त्याने
कर्तव्याचा बडगा उचलला.
राहीला उभा मेहनतीने
त्याला असतो जगाचा कळवळा.
बहिण भावांत प्रेमबंध जपत
वाढीस लावतो आंतरिक गुण.
अनेक कला त्याच्या अंगात
चांगल्याचा करतो सदा अंगीकार.
रक्षाबंधनाचा हा दिवस
आंम्हा आणतोच कुठूनही एकत्र.
हात डोक्यावरून त्याचा फिरतो मात्र
मनातील क्षीण नि दुःख क्षणमात्रात पळतं.
डाॅ. सौ. स्मिता सदानंद मुकणे.
ठाणे.















