prabodhini news logo
Home कारंजा प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे मा.प्रशांत रामटेके यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख –...

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे मा.प्रशांत रामटेके यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख – अभिष्टचिंतन 

0
78

वाढदिवसाची प्रथा आजकाल समाजात खुप रूढ होत आहे.बारा महिण्यातून येणारा हा एक दिवस प्रत्येकासाठी महत्त्व पुर्ण असतो. व त्याचा आनंद समाधान वेगळेच असते. जन्मदिवस हा एकच दिवस असतो तो कशा प्रकारे साजरा करावा ते ज्याचे त्याच्या वर अवलंबून असते. पुर्वी वाढदिवसाला फारसे महत्त्व नव्हते, परंतु आजकाल वाढदिवस म्हणजे उत्सवासारखे साजरे करताना दिसतात. वाढदिवस साजरा करणे म्हणजे नेमके काय ? आपण आयुष्याचे वाढणारे दिवस मोजतो की वाढणाऱ्या वयातून स्वतः ला वजा करतो हेच कळत नाही वाढदिवस म्हणजे फक्त नवे कपडे घालणे हौस मौज
करणे, पार्टीचे आयोजन करणे , आपल्या नातेवाईकांना हॉटेल मधे नेऊन केक कापून स्वादिष्ट भोजन खावू घालणे, दोस्त मित्रासंगे मजा मौज करणे ,किंवा गावभोजन देणे म्हणजे वाढदिवस साजरा झाला का ? आपला वाढदिवस आपण करतो किंवा मायबाप करतात तर कशासाठी, मुलाने आपण प्रसन्न आनंदी रहावे म्हणूनच ना मग दर वर्षाला येणारा तो आनंद
शोधा, कधी वाढदिवसाच्या दिवशी एखाद्या अनाथाश्रम मधे जाऊन बघा, एखाद्या वाढदिवसाला वृध्दाश्रमात
जाऊन बघा त्यांना हवी ती मदत करा, एखाद्या वाढदिवसाला हॉस्पिटल मधल्या दुखी रोगी लोकांना कपडे किंवा फळं वाटप करा , गरिब मजुरदाराच्या, कचरा वेचणाऱ्या मुलांना वह्या पुस्तके, कपडे किंवा अन्य वस्तूंची मदत करा, रंजल्यागांजल्या दुखिताच्या डोळ्याचे अश्रू पुसा व मायेचा हात द्या जमत असेल तर त्या निमित्ताने रक्तदान करा.
मग बघा तुमचा आनंद किती द्विगुणित होतो ते एक दिवसाचा आनंद वाटल्याने तुमच्या मनाला वर्ष भर जर आनंद मिळत असेल तर त्यापेक्षा सुखी व आनंदी माणूस कोण होऊ शकतो. तेच विचार तुमच्या मुलात रूजवा मोठी माणसे जर असे करू लागले तर त्यांच्या मनात रूजवण्याचे काम ही पडणार नाही. कारण मुलं हे मोठ्याचे अनुकरण करतात व त्याप्रमाणे वागतात.
वाढदिवस साजरा करण्यामागचे नेमके कारण काय असावे . तो कसा साजरा करावा यावर मार्मिक पणे विचार जर केला तर वर्षातून एकदाच का होईना पण आपण कोणाचे तरी भले करू शकतो, आपला मदतीचा हात कोणापर्यत तरी पोहचू शकतो व आपण त्यातून आनंदाचे काही क्षण वेचू शकतो. ते वाढदिवसाचे निमित्त साधून, तसेच लेकरांना आपण त्याच्या वाढदिवसाचे आनंदाने भरलेले सोनेरी महत्त्व पटवून दिले तर खऱ्या वाढदिवसाचे महत्त्व प्राप्त होईल हौस मौज व आशावाद याचा पाठलाग करत माणूस खऱ्या आनंद सुखाला मुखत आहे.व वाढदिवस म्हणजे प्रथेप्रमाणे समाजात रूढ होत आहे. हे आमच्या कधी लक्षातच येत नाही.

भारतीय पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचे महत्त्व आणि केकवर पेटवलेल्या मेणबत्त्या विझवण्याचे दुष्परिणाम ! पाश्चात्य पध्दतीने वाढदिवस साजरा करताना केकवर मेणबत्त्या पेटवून त्या फुंकून विझवतात.या पध्दतीमुळे फुंकरीसमवेत लाखो जिवाणू केकमधे येतात. म्हणून ती पद्धत योग्य नाही. असे आता पाश्चातांना समजले आहे. त्यामुळे त्यांनी या पद्धतीला प्रतिबंध करायचे ठरवले आहे. खरे तर हा झाला स्थुलातील भाग ज्याला सूक्ष्मातील कळते , तो पेटलेली मेणबत्ती विझवणे आणि केक सुरीने कापणे हे अशुभ आहे असे सांगेल स्थुलातील कारणापेक्षा सूक्ष्मातील कारणाचा परिणाम अनेक पटीने अधिक असतो . म्हणून वाढदिवस साजरा करण्याची पद्धत अयोग्य आहे. भारतीय पद्धतीत ज्याचा वाढदिवस आहे त्या व्यक्तीला आध्यात्मिक स्थरावर लाभ व्हावा अशा पद्धतीने साजरा करायला सांगितला आहे.
या मध्ये त्या व्यक्तीचा वाढदिवस त्याच्या जन्म तिथीच्या दिवशी साजरा करायला सांगून त्याचे औक्षण करायला व त्याला देवाला व वडिलधाऱ्या व्यक्तीला नमस्कार करायला सांगितले आहे. तसं केल्याने देवाचा व वडिलधाऱ्याचा आशिर्वाद लाभतो व चैतन्य ग्रहण होते
या पध्दतीत दिवा विझवणे नाही केक कापणे नाही, कोणतीही गडबड गोंधळ नाही . वाढदिवस मानसिक स्तरावर साजरा न करता आध्यात्मिक स्तरावर साजरा करायला सांगितले आहे. आणि त्यामुळे ती पध्दत लाभदायक आहे .
केकवर पेटवलेल्या मेणबत्त्या विझवताना फुंकरीतून लाखो जिवाणू केकमधे येवून मुलाना जिवाणूची बाधा होऊ शकते. वाढदिवसानिमित्त केकवर मेणबत्त्या लावल्या जातात , त्या फुंकल्यामुळे लक्ष लक्ष जिवाणू केकवर येतात . असा जिवाणू युक्त केक तुमच्या साठी योग्य नाही असे सांगण्यात येते. वाढदिवस कशाप्रकारे साजरा करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
प्रशांत सराविषयी सांगायचे झालेच तर प्रबोधिनी न्यूज माध्यमातून समाज कार्य चालू आहे असेच तुमचे कार्य चालू ठेवा समाज मनामनात कार्याचा ठसा उमटवा व समाज मनाचा ठाव घ्या…… तुमच्या कृतीशील आचरणातून साहित्य क्षेत्रात केलेली वाटचाल उल्लेखनीय आहे. यात शंकाच नाही . कोणत्याही समस्या अडचणी असल्यास तुम्ही या संदर्भातून भक्कम पणे सोडवत आहात ते अतुलनीय आहे. आम्हाला प्रबोधिनी मंच द्वारे स्वविचार मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते , तुमच्या समाज कार्य,धैर्याची उंच भरारी प्रगती पदाकडे जावो……
तुमच्या वाढदिवसानिमित्त मंगलमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा…. 
तुमचे सर्व स्वप्न साकार होवो…
उदंड व निरोगी आयुष्य लाभो…
हिच भगवंत चरणी मागणी मागते …….

नंदा भगत /कारंजा लाड
वाशिम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here