
अविस्मरणीय क्षण आज आहे,
स्वर्णीम क्षण वाढदिवस आला,
सजले सगळे मिळूनीया आज,
सुखद क्षणचं..तुम्हां आम्हांला, ..१..
तुम्हांला मिळावे आयुष्य मोठे,
दरसाल यावी ही संधी गुपचूप,
चळवळ आजची साहित्यातील,
मनात ठसते आहेचं खूप-खूप, ..२..
भरपूर आहेत कर्तव्य तुमचेच,
साहित्यास जणू आनंद पर्वणीच,
धैर्य कार्य महान असेच तुमचे,
संचालन करता छान असे तुम्हींच, ..३..
नवीनतम संधी वाचण्या नियमित,
काम नक्की आहे ते जगा वेगळेच,
आवडीचे झालेत सर्वांनाचं तुम्हीं,
सहभागी होणार दरवेळी सगळेच, ..४..
वाटते वाढदिवस रोजचं यावा,
आम्हीं सर्व रोजचं साजरा करणार,
कविता रूपा मध्ये कां होईना,
प्रबोधिनीच्या जगातमध्ये शिरणार, ..५..
नावाप्रमाणेच प्रशांत तुम्हीं सर,
नवोदितांना एक आधार मिळणार,
एकेक करून वाढतील भरपूर,
बरेच धुरंधर प्रबोधिनीला जुळणार….६..
राजेंद्र रामदास बनसोड
श्री.साईधाम नगरी,गणोरी रोड बाभूळगाव,जि.यवतमाळ















