prabodhini news logo
Home चंद्रपूर ज्ञानदीप प्रशासकीय महाविद्यालय, चौगाण येथे प्रथम आलेल्या विद्यार्थिनीच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न

ज्ञानदीप प्रशासकीय महाविद्यालय, चौगाण येथे प्रथम आलेल्या विद्यार्थिनीच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न

0
102

ज्ञानदीप प्रशासकीय महाविद्यालय, चौगान येथे १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्य दिनाचा भव्य सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
यंदाच्या वर्षीचे विशेष आकर्षण म्हणजे बी. ए. सिव्हील सर्विसेस अभ्यासक्रम मधून कॉलेजमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या कु. अनामिका विकास ठाकरे मु. सायगाव ता. ब्रम्हपुरी या विद्यार्थिनीच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी कॉलेजच्या यशस्वी विद्यार्थिनीचा व वडिलांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तिच्या हस्ते झालेल्या ध्वजारोहणामुळे विद्यार्थिनींचे योगदान आणि मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व परिसरात वाढेल अशी अपेक्षा राहील.
या वेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, देशाच्या स्वातंत्र्य संग्रामावर भाषणे, तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष, प्राचार्य, शिक्षकवृंद, पालक, विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते.

महाविद्यालयाचा अभिमान असलेल्या विद्यार्थिनीने ध्वजारोहणाचा मान मिळवून शिक्षणासोबतच कर्तृत्वाचे मोल अधोरेखित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here