
मुख्य अभियंता विजय राठोड
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – ऊर्जानगर(चंद्रपूर) : विद्यार्थ्यांनी नवीन आदर्श समाज व आपला प्रगत भारत घडविण्यासाठी शिक्षकाकडून योग्य मार्गदर्शन घेऊन स्वतःला घडविले पाहिजे जेणेकरून एक नवा आदर्श समाजात निर्माण होईल याकरिता विद्यार्थ्यांने ज्ञानार्जनातून आपले निश्चित ध्येय गाठावे असे प्रतिपादन मुख्य अभियंता मा.विजय राठोड यांनी केले. ते विद्यामंदिर हायस्कुल ऊर्जानगर येथे आयोजित बुक पेन व खाऊ वितरण कार्यक्रमात बोलत होते.
बुद्धीष्ठ फाउंडेशन ऊर्जानगरच्या वतीने दि १५ आगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला अध्यक्ष मा.विजय राठोड मुख्य अभियंता चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्र ,प्रमुख अतिथी उपमुख्य अभियंता मा.डाँ. भूषण शिंदे, मा.रवींद्र सोनकुसरे,मा.दिलीप पवार मुख्याध्यापक विद्यामंदिर हायस्कुल ,नरेंद्र रहाटे संस्थापक अध्यक्ष बुद्धीष्ठ फाउंडेशन तसेच सत्कारमूर्ती मा.श्री व सौ पान्हेरकर,वंदना मनपे,लक्ष्मण बोरकर अध्यक्ष बुद्धीष्ठ फाउंडेशन,मनसे संघटनेचे अध्यक्ष देवराव कोंडेकर, सचिव देवेंद्र मालुसरे यांची उपस्थिती होती.यावेळी मान्यवरांच्या हस्ते नुकताच डाँ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त दाम्पत्य श्रीराम पान्हेरकर व सुनंदा पान्हेरकर व विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त वंदना मनपे यांच्या सन्मान करण्यात आला तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विज कामगार संघटनेच्या नवनियुक्त अध्यक्ष देवराव कोंडेकर, सचिव देवेंद्र मालुसरे,कार्याध्यक्ष नारायण चव्हाण,कोष्याध्यक्ष अशोक लोहार यांचा मुख्य अभियंता यांच्या हस्ते शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला.विद्यामंदिर शाळेच्या संपूर्ण विद्यार्थ्यांना बुद्धीष्ठ फाउंडेशनच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते बुक,पेन व खाऊचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे संचलन सुभाष शेडमाके यांनी केले तर आभार देवराव कोंडेकर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी याशील सातार्डे ,राहुल दुपारे ,परमेश्वर गोवर्धन ,राहुल पाहुणे ,सचिन गायकवाड,धर्मेंद्र कनाके,धनराज सपकाळे, सुनील काटकर, किसन अरदडे, शुभम बोरकर, चहांदे, रामटेके,रंगारी,नागदेवते, मालती पाटील इत्यादीनी सहकार्य केले .















