
आगामी न.प. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ब्रम्हपुरीत भाजपला खिंडार
प्रवेशितांमध्ये शहरातील विविध भागातील कार्यकर्त्यांचा समावेश
रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज – ब्रम्हपुरी शहरात सुरू असलेल्या विधीमंडळ काॅंग्रेस गटनेते आ.विजय वडेट्टीवार यांच्या विकासाचा झंजावात बघुन काँग्रेस पक्षाच्या विचार सरणीला प्रेरित होऊन ब्रम्हपूरी शहरातील विविध भागातील भाजपा व अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांनी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशाने आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपला ब्रम्हपूरीत मोठी खिंडार पडली आहे.
गेल्या १० वर्षापासून विधीमंडळ काॅंग्रेस गटनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपूरी शहराच्या विकासासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून कोट्यावधींचा विकास निधी खेचून आणला आहे. तद्वतच संपुर्ण क्षेत्रांतील सर्व समाजाला समान न्याय, शिक्षण, आरोग्य, क्रीडा, अनेक सामजिक कार्य यांसह अत्यावश्यक मूलभूत गरजा पुर्ण करुन नागरिकांच्या अडचणी दूर केल्या आहेत. शहरात मोठ्या डौलाने उभ्या असलेल्या विविध शासकीय कार्यालयांच्या नव्या प्रशस्त इमारती, जलतरण तलाव हे त्यांनी केलेल्या विकासकार्याची साक्ष देत आहेत. त्यामुळे अशा विविध कार्यांना प्रेरित होऊन शहरातील भाजप पक्षाचे कार्यकर्ते, सेवानिवृत्त शिक्षक, युवक व महीला यांनी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
सदर पक्षप्रवेश शहर काँग्रेस सचिव पुष्पाकर बांगरे, जिल्हा काँग्रेस सहसचिव मोहम्मद गाजी पटेल यांच्या नेतृत्वाखाली पार पडला आहे.
पक्ष प्रवेश करणाऱ्यांमध्ये इकबाल जेसानी, दिपक खंडाईत, फारूक बकाली, आकाश राऊत, जाफर पटेल, मोनू कुरेशी, विराबद्रू कोटट्टावार, शाकीर पटेल, कुसन उईके, जयकुमार सहारे, लंकेश मेश्राम, प्रमोद सोंडवले, जाहिद पठाण, निखिल सहारे, हेमंत मस्के, राजू खापरे, वैभव करंडे, प्रा.भाऊराव बांगरे, एकनाथ ढोमणे, रमेश रोकडे, अनिकेत बांगरे, हरिश्चंद्र कुर्वे, राजेश्वर मिसार, नामदेव टेंभुर्णे, भिमराव बोरकर, चुडामन पडोळे, डोमेश्वर रेहपाडे, अनिल वडसारिया, लंकेश मेश्राम, प्रमोद सोंडवले, तुळशिराम बांगरे, जमशेद अली, वसंत नक्षिणे, श्रीराम कावळे, रमेश खंडाईत यांसह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
ब्रम्हपूरी शहरातील भाजपा पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपला रामराम करीत काॅग्रेस पक्षात प्रवेश केला. यामुळे आगामी नगरपरिषद निवडणुकीमध्ये काॅंग्रेस पक्षाचाच झेंडा फडकणार हे निश्चित मानले जात आहे. सदर पक्षप्रवेश प्रसंगी काॅग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.















