prabodhini news logo
Home चंद्रपूर विदर्भ तेली समाज महासंघाच्या वतीने चंदा वैरागडे सन्मानित

विदर्भ तेली समाज महासंघाच्या वतीने चंदा वैरागडे सन्मानित

0
190

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – विदर्भ तेली महासंघ जिल्हा चंद्रपूर च्या नूतन जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन समारंभ तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनियुक्त संचालक ,समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार समारंभ कार्यक्रम विदर्भ तेली समाज महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष रघुनाथजी शेंडे यांचे अध्यक्षतेखाली,अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला, या सत्कार सोहळ्यात सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चंदा मनोज वैरागडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

वैरागडे यांनी बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे मोठे संघटन, तसेच सामाजिक कार्यात त्यांनी रक्तदान शिबीर ,पर्यावरण वाचविण्यासाठी वृक्षारोपण, महिला सक्षमीकरणासाठी महिलांच्या विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, आनंद मेळावे ,महिला मेळाव्याचे आयोजन केले, महाराष्ट्रात महिला बचत गटाची, महिला पतसंस्था उभारली आहे, राजकीय कार्य सुद्धा वाख्यान्याजोग आहे .आज त्या चंद्रपूर शहर जिल्हा महिला अध्यक्ष या प्रमुख पदावर कार्यरत आहे .हे आपल्या तेली समाजासाठी भूषण आहे त्यांचा महान कार्याची दखल घेऊन चंदाताई वैरागडे यांचा महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष रघुनाथजी शेंडे ,यांचे हस्ते ,एड विजय मोगरे. सूर्यकांतजी खनके, डॉ विश्वास झाडे,प्रा नामदेवराव वरभे, पांडुरंगजी आंबटकर, अभय घटे,विजरावजी बावणे, विलास मोगरकर,गणेश तर्वेकर, शैलेश जुमडे, मीनाक्षी गुजरकर तसेच इतर प्रमुख मान्यवर, आणि समस्त समाज बांधव यांचे प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here