prabodhini news logo
Home छत्रपती संभाजीनगर जामनेरच्या सुलेमान खानच्या हत्येवर डॉ. ऐश्वर्री राठोड यांची प्रतिक्रिया

जामनेरच्या सुलेमान खानच्या हत्येवर डॉ. ऐश्वर्री राठोड यांची प्रतिक्रिया

0
125

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – जामनेर तालुका हे एकेकाळी विद्येचे माहेरघर होते. परंतु त्याच जामनेरला आज क्राइम मध्ये हॉटस्पॉट वर देशांमध्ये बघून वाईट वाटत आहे. सुलेमान खान या 21 वर्षीय बेटावदच्या तरुणाला ज्या क्रूरतेने दहा ते पंधरा लोकांनी वार करून हत्या केली आहे .हे फारच घृणास्पद आणि लज्जास्पद आणि माणुसकीला लाजवणारी गोष्ट आहे .समाजामध्ये वावरताना आजही प्रशासन, कायदा सुव्यवस्था आहेत. लव्ह जिहाद नाव देऊ या कृतीकडे वळवण्यात आलं .त्याच लव्ह जिहाचे एकही पुरावे कुठेही आढळून येत नाहीयेत. सर्वात मोठा प्रश्न हा माणुसकीचा आहे. माणुसकी हा आमचा धर्म आहे. आणि तो मानवाने प्रत्येक धर्म आणि जातीने निभवाला पाहिजे. ज्यांनीही कायदा हातामध्ये घेतलेला आहे त्यांना सर्वांना फासावर लटकवा. एकही आरोपी सुटता कामा नये. आज जर हे आरोपी बाहेर फिरले तर अजूनही कित्येक जीव घेतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here