
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – गुप्ता एनर्जी पॉवर लिमिटेड तथा हस्तांतरित विदर्भ मिनरल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याकडून, एका करारांतर्गत, नोकरीचे अमिश देऊन कवडीमोल भावांनी त्यांच्या जमिनी लाटून घेतल्या. आणि जेव्हा कंपनी आज चालू झाली आहे तेव्हा सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि स्थानिक कामगारांना डावलून परप्रांतीय आणि इतर जिल्ह्यातील लोकांना नोकरीवर घेऊन प्लांट सुरू करण्यात आलेला आहे.
आज प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि स्थानिक कामगाराकडे कामही नाही आणि त्यांचे जमिनीही नाही. त्यामुळे कंपनीकडे रोजगाराची मागणी करत, “आम्हा प्रकल्पग्रस्त शेतकरी तथा कामगारांना काम द्यावे अन्यथा आमच्या जमिनी परत करन्यात याव्या”, अशा घोषणा करत आंदोलन पुकारले आहे.
सदर प्रकरणाशी संबंधित शासन आणि कंपनी प्रशासन यांच्या कडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नसल्यामुळे . आर्थिक, मानसिक शोषणाला कंटाळून प्रकल्पग्रस्त शेतकरी तसेच कामगारांनी आज रोजी दिनांक 18/ 08 /2025 सोमवारला सकाळी 6:00 वाजेपासून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी तसेच कामगारांनी महाराष्ट्र मजदूर काँग्रेस (इंटक ) तथा विजयक्रांती जि. ई. पि. एल. पॉवर कामगार संघटनेच्या नेतृत्वात कंपनी गेट बंद तथा काम बंद आंदोलन पुकारले आहे. सदर आंदोलन हे जोपर्यंत कामगारांना व शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत चालू राहील. संबंधित आंदोलन,विजयक्रांती कामगार संघटनेच्या अध्यक्षा शिवानीताई वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय मजदूर कॉंग्रेस इंटक चे जिल्हाध्यक्ष – तथा कार्याध्यक्ष- विजय क्रांती कामगार संघटना मा. प्रविणभाऊ लांडगे यांचे नेतृत्वात तसेच विजयक्रांती कामगार संघटनेचे,महासचिव- महेंद्र वडस्कर,उपाध्यक्ष – विजय सोनेकर अरविंद पाचभाई , राजू पिंपळशेंडे, प्रशांत ढेंगळे, जितेंद्र झाडे,अनिल निखाडे, आकाश काळे, राजेश जेणेकर, प्रवीण भगत, भारत खनके, गणेश काळे इत्यादी पदाधिकाऱ्यांसह अन्य कामगार तथा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे.















