prabodhini news logo
Home चंद्रपूर कामगार कल्याण केंद्र ऊर्जानगर येथे स्वातंत्र्यदिना निमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

कामगार कल्याण केंद्र ऊर्जानगर येथे स्वातंत्र्यदिना निमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

0
185


तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज – ऊर्जानगर (चंद्रपूर): महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगार कल्याण केंद्र ऊर्जानगर चंद्रपूर येथे भारत देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्य दि.१५ आगस्टला श्री. गुरुदेव सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष, जेष्ठ नागरिक अशोक धमाणे यांच्या हस्ते तथा गुणवंत कामगार पांडुरंग बोबडे यांच्या उपस्थित ध्वजारोहण करण्यात आले.या कार्यक्रमाला जेष्ठ नागरिक देठे,राजेंद्र पोईनकर संगीत शिक्षक यांची उपस्थिती होती.मान्यवरांनी स्वातंत्र्य दिनानिमित्य आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. यावेळी बालगोपालांना लाडू,चॉकलेट खाऊचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला गुणवंत कामगार देवराव कोंडेकर,संतोष ताजने,धर्मेंद्र कनाके तसेच जेष्ठ नागरिक व ऊर्जानगर वासीयांची उपस्थिती होती.यावेळी नुकताच विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार मिळालेले बंडू पिंपलशेंडे व वंदना मनपे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.स्वातंत्र्यदिनाच्या या महोत्सवात दि.१३ आगस्टला मा.शंकर दरेकर सेवाधिकारी श्री. गुरुदेव सेवा मंडळ ऊर्जानगर यांचे हस्ते व दि.१४ आगस्टला गुणवंत कामगार धर्मेंद्र कनाके ,कवी सुरेंद्र इंगळे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहना खोब्रागडे मॅडम कामगार कल्याण केंद्राचे प्रभारी केंद्र संचालिका यांनी केले तर आभार सुवर्णा उपरे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेकरीता कामगार कल्याण केंद्राचे कर्मचारी मोहना खोब्रागडे, कविता सदाफळे,सुवर्णा उपरे यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here