
nagpur – महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते, विधिमंडळ काॅंग्रेस पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार यांच्या मातोश्री कमलाबाई नामदेवराव वडेट्टीवार यांचे आज दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ९ वाजून १२ मिनिटांनी त्यांच्या राहत्या घरी कमलाई निवास रामदास पेठ, नागपूर येथे निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले आणि एक मुलगी ही अपत्य आहेत.
उद्या दुपारी ३ वाजता राहत्या घरून पार्थिव मोक्षधाम घाट रोड, नागपूर येथे नेण्यात येईल आणि दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.















