
विचारांची क्रांती
प्रबोधिनी न्यूज नेटवर्कने
जागवली समाज चेतना
विचारांतून नवी क्रांती
फुलली आदर्श प्रेरणा (१)
प्रशांत सरांच्या ध्येयातून
मिळाली वाट साहित्याची
अनमोल झरा काव्याचा
बहरली आस मनाची(२)
झाला प्रगतीचा उदय
पत्रकारितेने दिला संदेश
नवचैतन्याचा उज्वल बोध
सत्यनिष्ठेने उजळला प्रदेश(३)
प्रामाणिकपणाची कसोटी
जागृती समूहाची खरी शान
सत्यावर कायम चालणारा
जनतेकडून प्रबोधिनीला मान (४)
जनमत जागविण्याकरिता
प्रबोधिनी ही सदा यशस्वी
वाढत राहो कार्य उत्तरोत्तर
हीच सदिच्छा मनस्वी (५)
डॉ.स्मिता गजभिये/ तिरपुडे
लाखनी,जिल्हा.भंडारा














