
रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज
ब्रम्हपुरी नगर परिषदेची निवडणूक नजिकच्या भविष्यात होऊ घातली आहे. त्याकरिता नगर परिषदेने प्रभाग रचनेचे प्रारूप तयार केले आहे. प्रारूप प्रभाग रचनेत ब्रम्हपूरी नगरपरिषदेचे अंतर्गत येणारी बोंडेगाव हुडकी वेगळी करून त्या भागाला प्रभाग क्रमांक ६ मध्ये समाविष्ट केले आहे. वास्तविक बोंडेगाव व बोंडेगाव हुडकी हे एकच गाव असून हुडकी या भागाला बोंडेगाव मधून वेगळा करण्याचा विरोधकांचा कुटिल डाव आहे असे बोंडेगाव वासियांचे मत झाले आहे. या बाबीकडे निवडणूक विभागाने लक्ष न दिल्यास व बोंडेगाव पासून बोंडेगाव हुडकी वेगळी झाल्यास ग्रामवासी मतदानावर बहिष्कार टाकणार आहेत. या आशयाचे निवेदन बोंडेगाव प्रभागातील नागरिकांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे.
निवेदन देताना प्रामुख्याने शहर काँग्रेस अध्यक्ष हितेंद्र राऊत, राजेश तलमले, गव्हर्नर रामटेके, चक्रेश करंबे, नेताजी मेश्राम, प्रा. डी के मेश्राम, राममोहन ब्राडिया, तारकेश राऊत, लोकमन शास्त्रकार, वेणुदास करंबे, दिनेश मेश्राम, मधुकर ढोरे, सुधीर रामटेके, कलिचरण बगमारे, निखिल करंबे, अभय भागडकर, अक्षय कुथे, दिलगंभीर कुथे, पिंटू सौंदरकर, प्रदीप ठेंगरे, निखिल सहारे, पद्माकर रामटेके, प्रेमनाथ बगमारे, आकाश वैद्य व बोंडेगाव येथील जेष्ठ नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.















