
महान शिक्षक सर्वपल्ली राधाकृष्णन
महत्तम गुरुला माझे शत शत वंदन
रोजच करावे स्मरण हेच शहाणपण
असाच व्हावा साजरा हो शिक्षकदिन
फळा काळा खडू पांढरा
चालना दे संतुलित विचारा
शिक्षकाजवळ असे सच्चेपणाचा थारा
शिक्षणाची वाहे प्रवाह धारा
खेडोपाडी, रात्र शाळेत घाम गाळती
सुविद्य सुशील विद्यार्थी घडवती
असुविधा, कष्टांची तया न भीती
शिकवणे हेच ध्येय आणि प्रीती
अनेक हुशार विद्यार्थी घडवती
पैलू हिऱ्यांना पाडण्या कष्ट घेती
दिशा दर्शक शिक्षक असती किती
जगभरात त्यांची गाजते किर्ती
समाज प्रबोधन आणि परीवर्तन
एकच असते ह्यांचे ध्येय
आत्मविश्वासाने सशक्त बनवणे
विद्यार्थी, देश, हे असते त्यांना प्रिय
अनेक रूपे येती शिक्षक आपल्या जीवनात
शिक्षणाचा शुभारंभ होतो बालपणात
आजन्म रहाते शिकणे , कधीच नाही संपत
म्हणूनच रहावे सतत शिक्षकाच्या सहवासात
तुम्हीच लाविले सकल जगात सच्चे ज्ञानदीप
कायम लक्षात ठेवू गुरुजी तुम्हीच शिल्पकार l
तुमच्या मूळेच मिळाला सर्व जगातील विद्यार्थ्यांच्या
सुशिक्षित सुरेखित आयुष्याला खरा आकार
(स्वरचित)
नीला चित्रे
चिंचवड पुणे















