prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – आई माझा पहिला...

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – आई माझा पहिला गुरु

0
99

आई म्हणजे माहेर असतं
कितीही रागावली ओरडली तरी
मायेच्या ओलाव्याचे घर असतं
रात्र असो, दिवस असो
पिल्लांसाठी दार उघडच असतं
काय हवं नको आईकडे मागता येत
दुखलं खुपलं आईला सांगता येत
आई म्हणजे जखमेवरच मलम असतं

तिच्या डोळ्यांतली दाट माया
आपल्यासाठी पाण्याचं सरोवर असतं
आईपाशी केव्हाही भांडता येत
आई म्हणजे आपला हक्क असतो
वाईट गोष्टी पासून आपलं रक्षण करणारं
ते एक अभेद्य कवच असतं

आई गेल्यावर मात्र
माहेर दारापाशी थांबत
आपल्या मनातलं दुःख सांगायला
हक्काचं असं स्थान नसतं
आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही
आई हे एक अढळपद असतं
आपल्याला आई गेल्यानंतर कळतं
आई इतकं मौल्यवान जगात काहीच नसतं

गुलाब अनिल वेर्णेकर, गोवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here