
पहिला गुरू असलेली (आई )
लुप्त होत चाललेला
आईचा पदर
“आई” म्हणजे प्रेम,माया, वात्सल्य, त्याग ह्या सर्व गुणांची सांगड घालणारी व्यक्ती आई एक असं नातं, ज्यापूढ जगातील सर्वच नाती फिकी परतात एक आई आपले संपूर्ण जीवन अपत्याकरीता अर्पण करून देते, आईच्या जन्म देण्याने फक्त ती पुर्णजन्म मिळवते खरे पण त्यानंतर तीची ममता, तिच्या साहाऱ्याने तिच्या मार्गदर्शनाने व्यक्तीचं जीवन प्रकाशमान होते है नव्याने सांगणे गरजेचे नाही
आई व तिची ममता ह्याची तुलना कुठल्याही नात्याशी होवू शकत नाही पदोपदी आई आपल्या मुलांचा आधारस्तंभ बनून उभी राहते एक स्त्री तेव्हाचं पूर्ण होते जेव्हा ती आई, बनते आई मुलांची खरी मैत्रीण असते. परंतू हे सौभाग्य प्रत्येकाच्या नशीबी असतेच असे नाही. घराला घरपण देणारी, चार भिंतीच्या खोलीला घर बनविणारी आपल्या मुलांकरीता देवासमान असणारी व्यकी म्हणजेच आई
निस्वार्थ भावनेने आपल्या मुलांकरीता जीवनाची राखरांगोळी करणारी, मुलांच्या उदरनिर्वाहकरीता राबराब राबणारी, मुलांच्या स्वप्नपूर्ती करीता सतत लढत राहणारी जन्मदाती, नऊ महिने ,नऊ दिवस आपल्या उदरात ठेऊन आपल्या रक्तातील थेंबा थेंबाने, वाढवणारी, जन्म देताना शारीरिक यातनांचा सामना करून जग दाखविणारी स्री , युगानुयुगापासून आपण आईची गाथा ऐकत, वाचत,लिहीत आहोत मला आज आईच्या पदराची किंमत काय ? आधीची आई व आजची आधूनिक आई यात अंतर फक्त पदराचा आहे, असं मला वाटतं आई आईच असते. संबोधनाने जरी ती मॉम, मम्मी
मम्मा असली तरी जन्मदात्री आहे. ‘आई या शब्दाची फोड केली असता
आ — म्हणजे आत्मा
ई —म्हणजे ईश्वर या दोघांचा संगम म्हणजेच आई
आईच्या पदराचं महत्व खूप अनमोल आहे. आईच्या पदराखाली आई मुलाला संरक्षणाची भिंत देते. आई आपल्या बाळाला पदराखाली ठेवते जणू सा-या जगापासून त्याचे संरक्षण करते. त्याचप्रमाणे त्या तान्हया जीवाला, देखील आईच्या पदराखाली सुरक्षिततेची जाणीव होते भिती वाटत नाही.
निस्वार्थ प्रेम देते स्वरक्षण पदराखाली मिळते आईच्या पदराने तोंड पुसणे, जेवनानंतर
आई लगेच पदराने तोड पुसते, आपल्याला घाम आलेला बघताक्षणी आईचा हात पदराकडे जाणे व लगेचच पदराने चेहरा पुसणे, याहुनी पलिकडे म्हणजे लहान बाळ असो वा मोठा, मोठी मुलगी अतिशय सुंदर दिसत असली की किंवा मोठ कर्तुत्व पार पाडल्यानंतर घरी येताच आई लगबगीने तिच्या पदर उतरवुन दृष्ट काढणे ही अंधश्रद्धा असली तरी आईचे मन पदर उतरवूनच, मानते. आईच्या पदराने नजर उतरते असे मानले जाते. जून्या काळात आईच्या पदराची गणना कशातच केली जावू शकत नसे. शाळेचा पहिला दिवस असला की आईचा पदर पक्का धरून ठेवणे, पदर धरून घरभर मागेमागे फिरणे अश्या आनंददायी आठवणी पदराशी जुळतं होत्या आधुनिक आई जीन्स, लेगीज,कुती, टीशर्ट घालणारी असल्यामुळे पदराच महत्व आजच्या नव्या पिठीला अनुभवायला मिळत नाही. आई जशी मऊ महिने बाळाला आहाराचा पुरवठा नाळच्या माध्यमातून करते त्याचप्रमाणे जन्म झाल्या-पासून आईचा पदर नाळेच काम करते. अशी माझी कल्पना आहे. आईच्या मायेच्या, प्रेमळ पदराची किंमत तिच्या पदराला स्पर्श करताच जाणवते. तिच्या बाळाला जरा-जरी इजा झाली की लगेच पदराने पुसत काहीच झालं नाही तुला मी पदराने पुसले असे म्हणता क्षणीच मुलांना आईने जखमेवर मलम लावल्याप्रमाणे जाणीव होऊन लगेच त्याचें दुखणे कमी झाल्याचे त्याला वाटतें आईच्या ममतेच महत्व इवल्याशा कपड्याने
येत नाही पण आईच्या पदराशी जुळलेल एक भावनिक नात मानसाला प्रसन्न ठेवते. मायेची पाखरण करणारी एक महिला म्हणजे आई अपत्याच्या जन्माने तीला मातृत्व प्राप्त होते समाजाच्या दृष्टीने ती आई बनते. कुठल्याही परताव्याची अपेक्षा न करता निस्वार्थपणे मुलांवर जीवापाड प्रेमाचा वर्षाव करते. पक्षी आपल्या पिलांच स्वरक्षण पंखाखाली घेवून करते तशी स्त्री आपल्या मुलांच संरक्षण पदराखाली घेऊन करते एक म्हण आहे ना की आई आपल्या पाल्यांच्या कितीही चुका वा वाईट गुण पदराखाली घेते.
” आई मुलांच्या चुका पदराखाली घेते’
आज आधुनिक परिधानामुळे आईचा पदर मागे पडत आहे. पुढे काही कालावधी नंतर आईचा पदर असणार की नाही हेही सांगता येत नाही. आईच्या पदराची किंमत ओळखा, आपली संस्कृत जपा, आदराने पदराला डोक्यावर घेणाऱ्या स्त्रीया आज फारच अल्प आहेत. साडी ही वेशभुषा आपली संस्कृती जपणारी आहे अस माझं वैयक्तिक मत आहे.
प्रा.सिम्रेला देशमुख
अमरावती















