
डॉक्टर बाबासाहेब
आहेत ज्ञानाचा झरा
वाचुनी त्यांना आयुष्य
आपलाच उद्धार करा
ज्ञानाची तुळस भीम
भिमाईचा दुलारा
त्यांच्यामुळेच मिळाले
स्त्रिया, kकमजोराना सहारा
एका पेणच्या टोकांने
घडविला क्रांतीचा इतिहास
ज्ञानाचा झरा वाहतो आज
त्यांच्या संविधानाचा विश्वास
सिम्बॉल ऑफ नॉलेज
नतमस्तक सारे झाले
ज्ञानाच्या या वाऱ्याने
आयुष्य हे कमाल केले
बाबासाहेब या वादळाला
नाही पकडू शकले कोणी
जगात एकच असा विद्वान
जो खंबीर होता कष्ट सहून
रंजना भैसारे, नागपूर















