
धडक देऊन वाहन चालक पसार, वासरू गंभीर जखमी
कोरची प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : गुरुवारी संध्याकाळी सुमारे 6 च्या दरम्यान एका अग्यात कार चालकाने गायी व वासरूला जबर धडक दिली सदर घटना ही कोरची येथील बस स्थानकाजवळ घटली असून यामुळे नागरिकांमध्ये संताप सुद्धा व्यक्त केला जात आहे.
आज कोरची येथील बस स्थानकाजवळ सुसाट येणाऱ्या एका कारणे गाय वासरूला जबर धडक दिली यामुळे वासरू हे रक्तबंबाळ झाले असून त्या वासरूला गंभीर दुखापत सुद्धा झालेली आहे यामुळे गोवंश प्रेमींनी यावर नाराजी सुद्धा व्यक्त केलेली असून अशा प्रकारे गाईला धडक देऊन पसार झालेल्या व्यक्तींवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सुद्धा नागरिकांनी केलेली आहे.
या गाई व वासरूला धडक देऊन पसार होणारे वाहनचालक कोण? याची तपासणी करण्याची मागणी सुद्धा नागरिकांतर्फे करण्यात येत आहे सदर घटनेची माहिती प्राप्त होताच कोरची येथील काही प्रतिष्ठित नागरिक यांनी घटनास्थळी जाऊन वासरूला उपचार मिळावा याकरिता प्रयत्न केले.















