
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ समाजसेवक रमेश अण्णा मुळे यांनी निवेदनाद्वारे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री माननीय मंगलप्रभात लोढाजी यांच्याकडे तासिका, कंत्राटी, पीपीपी, एम्प्लॉयबिटी स्किल या सर्व योजनेतील शिल्प निदेशकांना सर्व अडचणी दूर करून कायम करण्यासाठी विनंती केली आहे. याबाबतची निवेदन त्यांनी मंत्री महोदय यांना दिले आहे. मंत्री महोदय यांच्या कार्यालयाकडून संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालय मुंबई यांना नियमाप्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याबाबत ज्येष्ठ समाजसेवक रमेश अण्णा मुळे यांनी असे सांगितले की, माननीय मंत्री मंगलप्रभात लोढाजी यांच्या प्रयत्नातून मागील वर्षी ३५० कंत्राटी शिल्पनिदेशकांना कायम करण्यात आले होते. विशेष म्हणजे ती प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबवली होती. मंत्री महोदय यांनी “पाच वर्षापेक्षा जास्त कुठल्याही योजनेत शिल्प निदेशक पदावर काम केलेल्या कर्मचाऱ्यांची परीक्षा घेऊन उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात यावे” असे निर्देश संचालक महोदय यांना दिले होते. तथापी सध्या संचालक यांनी जी यादी प्रकाशित केली आहे त्यात अनेक त्रुटि आहेत.
अलीकडेच ज्येष्ठ समाजसेवक रमेश अण्णा मुळे यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी घट्ट नाळ, मराठवाडा-विदर्भातील लाखो अनुयायांचा पाठिंबा, निस्वार्थी सेवाभाव आणि स्वच्छ चारित्र्याचा ठसा ही त्यांची खरी ओळख मानली जाते. गरीब-गरजूंना मदतीचा हात देण्यात आणि सामाजिक कार्यात रमेश अण्णा नेहमीच अग्रभागी असतात. महाराष्ट्रातील साधू-संतांशी व इतर समाजातील साधू संत मध्ये ही त्यांचा दांडगा संपर्क आहे व प्रभावी नातं अधोरेखित आहे.
कोणतीही ओळख नसताना केवळ समाज माध्यमातून आलेल्या मेसेज मुळे ज्येष्ठ समाजसेवक रमेश अण्णा मुळे यांनी समयसूचकता दाखवत केलेली मदत हजारो कुटुंबीयांना जन्मभर न विसरणारी आहे. आमच्या दहा दहा वर्षाच्या सेवेला परमनंट होण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यांनी हि सर्व प्रक्रिया होई पर्यन्त आम्हाला साथ द्यावी मदत करावी. अशी विनंती अनेकांनी व्यक्त करत त्यांना धन्यवाद दिले आहेत.















