prabodhini news logo
Home गोंदिया गोंदिया नवीन जिल्हा नियोजन भवन कार्यालयाचे उद्घाटन!

गोंदिया नवीन जिल्हा नियोजन भवन कार्यालयाचे उद्घाटन!

0
93

गोंदिया दिनांक 12 : नव्याने बांधण्यात आलेल्या गोंदिया जिल्हा नियोजन भवन कार्यालयाचे भव्य उद्घाटन आज राज्याचे सहकार मंत्री तथा पालक मंत्री बाबासाहेब पाटील यांचा हस्ते संपन्न झाले.
यावेळी पालक मंत्री म्हणाले, या भवनामुळे जिल्ह्यातील विकासकामांच्या गतीस नवे बळ मिळणार असून, नियोजनाशी संबंधित सर्व विभागांचे कामकाज एकाच ठिकाणी कार्यक्षम पद्धतीने पार पडणार आहे.
जिल्हावासीयांच्या सोयीसाठी आधुनिक सुविधा असलेले हे नवीन भवन उभारण्यात आले आहे. तसेच जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी या इमारतीचा उपयोग प्रभावीपणे व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. गोंदिया जिल्ह्यातील विकास आराखड्याचे नियोजन, अंमलबजावणी आणि पाठपुरावा यासाठी हे नवीन भवन एक महत्त्वपूर्ण केंद्र ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here