prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – वाढती बेकारी

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – वाढती बेकारी

0
113

इथे तिथे गल्लोगल्ली
पोरं जमतात सारी
हाताला काम मिळना
वेळ घालविती बिचारी

कुणी काढतो मुलींची छेड
कुणी खातोय गुटखा
ऐष आरामात जीवन जगती
बापाच्या खिशाला फटका

यांच्याकडे गुणवत्ता आहे
तरी नाही लागत नोकरी
नोकरी नाही म्हणून
कुणी देईना छोकरी

पदव्या घेऊन घरी बसले
यांच्यासाठी कोटा नाही
सत्तर टक्के असुनसुद्धा
नोकरीसाठी भटकत राही.

सौ.सुनंदा बाळासाहेब वाळुंज ठाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here