
अति तिथे माती
खेळ निसर्गाचे सांगती
संतुलित ठेवा दाही दिशा
शेवटी होणार आपली माती…..१
जीव- जंतू सारे आपले
धरणी नी वाहिले किती ओझे
परंतु कुशीत सर्व समावूनी
कधी मोजले का पैसे तुझे…..२
रान फुले ही फुलूनी
निसर्ग फुलतो श्रावणात
धन्वंतरी प्रसन्न झाले
थोडी कदर असू दे तू मानवा….. ३
सूर्याच्या प्रकाशाविना
कसे गवतही उगवतील
कुजून सारे विश्व इथे
नाश क्षणात पाहशील….. ४
सौ. वर्षा साठे शिंत्रे
पणजी, गोवा















