
कधी वेदनेचे बोचले काटे
वाटते आयुष्याला फुटले त फाटे
कधी नभाची उंची गाठावी
निर्व्याज प्रेमाची बुद्धी साठावी
कधी मिळते हास्याची पुकार
वाटते जणू स्वप्न झाले साकार
पाहतो कधी समाजातील विषमता
शाळेतीलच धडा का फक्त समता
माता पिता गुरुजनांची थोरवी
द्वेष क्लीमिशे जी सारी सोडवी
उत्साही काळ तो सकाळचा
राग कधी येतो प्रदूषणाचा…
कधी प्रियेच्या डोळ्यात आसवे
वाटतात जणू ती फसवे…
कधी तिचा घोर होतो रुसवा
मग वाटतो तिचा राग फसवा
रंग आयुष्याचे सारे
टिपतो मी कवितेत…
लिहितो मी सारे
माझ्या आवडीच्या कवितेत
माझ्या आवडीच्या कवितेत.
गायकवाड मनोज रामचंद्र
शहापूर जिल्हा ठाणे















