prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – निसर्ग किमया 

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – निसर्ग किमया 

0
134

प्रभाती दर्शन
फुलला मोगरा
गंध दरवळ
आनंदली धरा ।।1।।

पखरण शुभ
भुईवर झाली
तरु,वेली सारे
आनंदून गेली ।।2।।

स्वर्ग अवतरे
जणू भूमीवरी
निसर्ग किमया
चराचरा वरी ।।3।।

भ्रमर गुंजन
करी भोवताली
दृश्य मनोहर
पाही वनमाली ।।4।।

क्षण सुखावत
हर्षती किरणे
सूर्य, चंद्र, नभी
नक्षत्रांचे देणे।।5।।

निसर्ग देतसे
चैतन्य मनाला
ओंजळ फुलांची
वाहते प्रभूला ।।6।।

सौ. यादव उज्ज्वला राजेंद्र
हडपसर, पुणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here