
निसर्ग आपला सखा सोबती
तो आपला आधार काठी
देवरूप होऊन उभा आहे
जगताच्या रक्षणासाठी.(१)
निसर्ग ठाई आहे
पंचमहाभूतांचा वास
पालन,पोषण,संवर्धन
आणि जतन करी खास.(२)
निसर्ग आहे आपला गुरू
अबोल कृतीतून शिकवितो
नि:स्वार्थी सेवा करीतो
मानवी मूल्ये जपतो.(३)
भारतीय संस्कृतीने जाणले
महद महत्व निसर्गाचे
सण समारंभ गुंफले आहेत
रक्षण करण्या पर्यावरणाचे.(४)
स्वार्थाला घालून लगाम
रक्षण करणे कर्तव्य मानवाचे
देवत्व जाणून निसर्गाचे
कृत्य ठरेल कृतार्थ भावाचे.(५)
अंजली गरगटे (पुणे )















