prabodhini news logo
Home ठळक बातम्या भंडारा येथील रेल्वे मैदानावर वृक्षारोपण

भंडारा येथील रेल्वे मैदानावर वृक्षारोपण

0
166

जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674

(भंडारा ) – नंदगोपाल फाउंडेशन पर्यावरण संस्थेच्या वतीने जागतिक हिंदी दिन व नंदगोपाल फाउंडेशनच्या सक्रिय कार्यकर्त्या सुहानी फुलबांधे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार ( ता.14) ला रेल्वे ग्राऊंड खात रोड भंडारा च्या मैदानावर विविध प्रजातींची वृक्षारोपण करण्यात आले.

वृक्षारोपण कार्यक्रमाला जीवन सार्वे अध्यक्ष हनुमान मंदिर देवस्थान रुख्मिणी नगर, डॉ. यशवंत लांजेवार संस्थापक नंदगोपाल फाउंडेशन, प्रा. वासुदेव मोहुर्ले, विलास गायधने अभियंता, नंदगोपाल फाउंडेशनच्या कार्यकर्त्या सुहानी फुलबांधे, मनिषा भांडारकर, ज्योती श्यामकुवर, ॲड. मृणाल बांडेबुचे, क्रीडा शिक्षक अरूण बांडेबुचे तसेच हनुमान मंदिर देवस्थान रुख्मिणीवासी, नंदगोपाल फाऊंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माझे बाळ माझे झाड संकल्पनेवर आधारित वृक्षारोपण, २ ते ३ वर्षाची उंच झाडांचे भंडारा शहर हिरवेगार करण्याचा संकल्प केला आहे. त्या माध्यमातून रेल्वे ग्राऊंड खात रोड भंडारा च्या मैदानावर विविध प्रजातींचे वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक विलास केजरकर यांनी केले. प्रास्ताविक सेवानिवृत्त प्राचार्य अविनाश चौधरी यांनी केले तर उपस्थितांचे आभार समीर नवाज यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नंदगोपाल फाऊंडेशनचे भोजराज गौतम, राहुल मेश्राम, रविशंकर साकोरे, हेमराज ठाकरे, सरिन भोयर, अनोद साठवणे, सुंदरलाल मेघवानी, दिनेश हरडे, मनोज लांजेवार, मेघश्याम झंझाळ, रविशंकर साकुरे, ओमप्रकाश लांजेवार इत्यादी नागरिक तसेच नंदगोपाल फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here