
शेगाव प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज – कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय रक्तस्त्राव होणे याला हिमोफिलीया आजार म्हणतात. हा दुर्मिळ आजार आहे. या आजाराच्या रुग्णांसाठी हिमोफिलिया पेशंट अस्सी्टन्स प्रोग्राम आयोजित करण्यात आले होते. ज्यामध्ये फॅक्टर ८चे वितरण, सेल्फ-इन्फ्यूजन प्रशिक्षण आणि फिजिओथेरपी सत्रांचा समावेश होता.
हे शिबिर इंटास फाउंडेशन आणि लीलाशंकर फाउंडेशन यांच्या सहकार्याने, लीलाशंकर फाउंडेशनचे संस्थापक डॉ. राजकुमार सिरसम यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले होते.
या अनोख्या उपक्रमाला नागपूर येथील इंटास फाउंडेशनचे प्रकल्प समन्वयक निखिल वैद्य, समुपदेशक कालिदास वडमे, समुपदेशिका प्रवीणा गेडाम, अकोला हिमोफिलिया सोसायटीचे सचिव शर्मिला सयाम, पारितोष सयाम आणि अनेक हिमोफिलिया रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते .
बुलढाणा जिल्ह्यात रक्त गोठण्याचे घटक (फॅक्टर) उपलब्ध नसल्यामुळे, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना अनेकदा नागपूर किंवा अमरावतीला जावे लागते. या आव्हानाला तोंड देत, इंटास फाउंडेशनने ६० रुग्णांना मोफत फॅक्टर VIII (५०० आययू) १२० वाईल्स वाटप केले. याव्यतिरिक्त, शारीरिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी फिजिओथेरपी व्यायामांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले आणि स्वयं-इन्फ्यूजन प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन अश्विन दाते यांनी केले .















