
प्रेरणा महाविद्यालयात साहित्यनिर्मिती कार्यशाळा
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – गडचांदूर : साहित्य निर्माण करण्यासाठी व्यासंग परिसर सातत्यपूर्ण त्याने लेखन करणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांनी साहित्य निर्मितीच्या सर्व शक्तीचा अवलंब करत साहित्य निर्मिती करून प्रकट व्हावे असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. हेमचंद दुधगवळी यांनी केले. युगचेतना ग्रामविकास बहुउद्देशीय संस्थेद्वारा संचालित प्रेरणा महाविद्यालयात साहित्य निर्मिती कार्यशाळेत बोलत होते.
या कार्यशाळेला मुसणे प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ. हेमचंद्र दुधगवळी, प्रा. उज्वला जानवे, प्रा. प्रवीण आंबटकर, प्रा. इजाज शेख, प्रा. सुनील साबणे, प्रा. दुर्गावती खुबाळकर, प्रा. अंजना पवार, कु. कुंजम शेंडे व अर्चना मुत्यलवार उपस्थित होते. या कार्यशाळेत मराठी भाषेविषयी प्रा. उज्वला जानवे, साहित्याविषयी,प्रा.डॉ. हेमचंद्र दुधगवळी यांनी तर नाटकाविषयी प्रा. मुसणे यांनी सखोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. महाविद्यालयाच्या वतीने ज्येष्ठ समीक्षक प्रा.डॉ. हेमचंद दुधगवळी यांचा शाल, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. दुर्गावती खुबाळकर मॅडम यांनी तर प्रा. प्रवीण आंबटकर सरांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.















