
अपेक्षा पुर्ण करताना
मी पार वाकुन गेले
सगळ्यांचे हट्ट पुरवताना
मी तर आता थकुन गेले
आईबाबांच्या अपेक्षा होत्या
शिक्षणाबरोबर स्वयंपाक यायला हवा
दुसऱ्याच्या घरी गेलीस तर
दे वंशाला दिवा
सगळ्यांचे सगळं केलं तरी
अपेक्षा काही संपत नाही
स्वतःसाठी जगायलाही
वेळ काही पुरत नाही
मुलांच्या अपेक्षा असतात
आवडीचं जेवण करावं
छान छान पदार्थाचं ताट
आईने पुढ्यात द्यावं
माझ्या अपेक्षा मात्र
मनातल्या मनात राहील्या
प्रत्येकाचे हट्ट पुरवताना
त्या गंगाजळी वाहील्या.
सौ सुनंदा बाळासाहेब वाळुंज ठाणे















