
अपेक्षा अपेक्षा अपेक्षा
मानवी मनाला शाप
चक्र हे कधी थांबत नाही
किती ही मिळाले नाही मोजमाप. (१)
पूर्ण होत एक अपेक्षा
लगेच दुसरी सुरू
पूर्तीचा आनंद न घेता
नव – धावण्याचे कार्य सुरू. (२)
अपेक्षा आहे एक रिपु
लोभ मोहाला नाही सीमा
मनासारखे सतत घडावे
ही अपेक्षा येत नाही कामा. (३)
अपेक्षा हवीच जीवन
प्रगती साठी
अपेक्षा करता ध्येय सिद्धी
अपेक्षा करीता मिळे दिशा
सद्गुणांची होते वृद्धी. (४)
चांगले वाईट आपुल्या हाती
अपेक्षाची करावी पूर्ती
पूर्ती होता मिळते
आत्मविश्वास आणि स्फूर्ती (५)
मर्यादेत राहून करावी
स्वप्नपूर्तीची आराधना
अपेक्षा विरहित जीवन
हीच खरी जीवन साधना. (६)
अंजली गरगटे.(पुणे)















