
सौंदर्याची मोहक मूर्ती
कला कौशल्याची खाण
असशी तु सुगरण भारी
गुणांमुळे मिळतंय मान
तुझ्या मनातील विश्वास
करतो ध्येयाने वाटचाल
लाख संकटांना तुडवत
वादळात खंबीर मशाल
आत्मविश्वासाची प्रेरणा
मिळते तुझ्या कार्यातून
प्रामाणिकपणा सुसंस्कारी
आदर्श तुझ्या वागण्यातून
स्मित हास्याने उमलते
घरात सुखाचं नंदनवन
चंदनाच्या अमूल्य गंधाने
उत्साहित होतंय जीवन
अविरत कष्टाने साकारला
स्वप्नांचा सुंदर महाल
दिला श्वास जगण्याला
तुझ्या जिद्दीची कमाल
डॉ. स्मिता गजभिये/तिरपुडे
लाखनी, जिल्हा.भंडारा















