
वेदनेच्या हुंकाराला
शमावण्याची अपेक्षा
कठोर मेहनतीची
न व्हावी कधी उपेक्षा….
संकटांचा डोंगर
घुंगावता वारा
कधी कधी मागणीचा
होतो तो फापट पसारा…..
कुणी कानात कुजबुजती
नको ते उद्बोधन करती
सुंदर नात्याची अपेक्षा
मग धुळीला मिळवती…..
कुणाला नात्याची अपेक्षा
कुणाला पैशाची अपेक्षा
तारेवरची कसरत करता
कसे आयुष्याला मोजता….
कुणी मानासाठी रुसलेला
नको त्या अपेक्षांच्या ओझ्यात
सारं काही वाटून फसलेला
चेहऱ्यावरच्या स्मितहास्यात…..
गायकवाड मनोज रामचंद्र
शहापूर जिल्हा ठाणे















