prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजची कविता – अपेक्षा

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजची कविता – अपेक्षा

0
120

जन्मापासून मृत्यूपर्यंत
अपेक्षा कधी संपत नाही,
वाढते अपेक्षांचे ओझे
सुन्न होतात दिशा दाही ।।1।।

अरे माणसा कशासाठी सारे
खेळतोस उगीचच खेळ,
अंथरूण पाहून पाय पसरावे
तेव्हाच खरा बसेल मेळ ।।2।।

लाभला सुंदर मनुष्य जन्म
त्याचा आनंद जगून घे ,
माझं माझं कुठवर करतोस
तुझा स्वार्थीपणा सोडून दे ।।3।।

सुखदुःखाचे सोबती भोवती
दृष्टी तुझी स्वच्छ ठेव,
हाकेला तुझ्या धावतील सारे
माणसा माणसात भेटेल देव।।4।।

मनाला तुझ्या घाल लगाम
सहज होणार नाही हार,
अपेक्षांची पूर्ती होण्यासाठी
कष्ट सोसावे लागतात फार ।।5।।

सौ. यादव उज्ज्वला राजेंद्र
हडपसर, पुणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here