prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजची कविता – “दामिनी”

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजची कविता – “दामिनी”

0
116

दामिनी म्हणजे वीज
तळपती आग जीवनात
तशीच आजची ललना
खर्चे आयुष्य स्वत्व मिळण्यात

उगीच नाही तुलना दामिनीशी
करी सगळा जमाना स्त्री चा
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व लाभते
आशीर्वाद भरभरून दुर्गा देवीचा

अबला नारीने उचलावा विडा प्रतिकाराचा
अन्यायाविरुद्ध सन्मानाने लढून जगण्याचा
विसरु नकोस तुच आहेस सावित्री, दामिनी
तू नाहीस तर काहीच नाही लक्षात ठेवण्याचा

कर्तव्य तत्पर, प्रेमळ, करारी न् अष्टावधानी
तुच कर्ता तुच धर्ता समंजस कष्टाळू गुणी
कितीही कौतुक केले तरी आहे ते कमी
करारी, प्रसंगी कठोर तरीही गोड वाणी

कधी आला कंटाळा ,निराशा न् औदासीन्य,
उठ, मोकळा श्वास घे, प्रसन्नतेने घे भरारी
कर निर्दालन दुष्टांचे काली, दुर्गा, चंडीके
विसरु नकोस ओळख तुझी दामिनी हीच खरी

(स्वरचित)
 नीला चित्रे
चिंचवड पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here