
तूच दुर्गा ग सावित्री
शिकवले आम्हा धडे
तुझ्यामुळे जीवन हे
आनंदीच झाले गडे।।१।।
होता तुझा ग आम्हाला
खरोखर हे आधार
तुझ्यामुळे स्वप्नं आज
खरच झाले साकार।।२।।
खचून नाही गेलीस
झालीस दुर्गा भवानी
तुझ्या हाती तलवार
तूच खरी ग दामिनी।।३।।
प्रचंड बळ अंतरी
विश्वासाने लढले
तुझ्यामुळे ग सावित्री
छान बदल घडले।।४।।
तूच दिलेस ही शक्ती
तूच झालीस दामिनी
अन्यायाचा प्रतिकार
शिकवले सौदामिनी।।५।।
दिलेस आम्हाला बळ
चालवण्या ग लेखणी
आनंद फुलून व्हावे
खरोखर आज मनी।।६।।
प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे, लातूर















