
अस्तित्व तुझे
दामिनी तु सौदामिनी तु
तुझ्या अंगी विजेचं बळ
तुझ्या साहसाचे होते कौतुक
तु चपळ प्रामाणिक सोज्वळ
तु सहनशीलतेची निर्मळ देवी
कधी स्वरक्षणा हातात शस्त्र
वैचारिक तुझी बांधिलकी
नेत्रदीपक वापरशी अस्त्र
माथी लेवून सौभाग्याचं लेणं
कधी मर्दानी दाखवी बाणा
तुझे चंद्रावरही पडले पाऊल
कधी धैर्याने लढशी रणांगणा
लेकराच्या खडगीसाठी
देहाचा ही करशी व्यापार
प्रपंच घरसंसार चालवण्या चातुर्याने सांभाळशी कारोभार
तु गौरव मांगल्याचे प्रतिक
समाजा करते प्रकाशमान
लाखो दिव्याच्या झगमगाटात
पण ” ती ” पणतीचा बहुमान
लढते झगडते नटते सजते
कधी पतीसंगे गेली सती
पुरुषी दास्यत्वातून नव्हे सुटका
दाशीनावे सोडले वाराणसी काशी
तिच्यात दुर्दम्य इच्छा शक्ती
कधी अंधश्रद्धेला पडते बळी
भ्रामक मनुस्मृतीची बंधने
अगतिक अस्थिरतेतून लादते रूढी
तुझ्या आयुष्याची ही कहाणी
धर्मग्रंथ,वेद,पुराणही स्मरते
तुझ्या अस्तित्वाची उकल नाही
मनुवादी अग्नी आजही धगधगते
नंदा भगत /कारंजा कारंजा
जि. वाशिम















