prabodhini news logo
Home ठळक बातम्या नरीमन पॉईंट ते मीरा-भाईंदर – प्रातप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश

नरीमन पॉईंट ते मीरा-भाईंदर – प्रातप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश

0
152

आता केवळ अर्ध्या तासात प्रवास!

मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी (ठाणे)
प्रबोधिनी न्युज नेटवर्क

दहिसर-भाईंदर ६० मीटर रुंदीच्या रस्त्याला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. परिवहन मंत्री प्रातप सरनाईक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाने तब्बल ५२.९८ एकर जमीन राज्य सरकारला हस्तांतरित करण्यास मान्यता दिली आहे.

सरनाईक यांनी गेली ५-७ वर्षे हा विषय सातत्याने राज्य व केंद्र शासनाकडे मांडत ठेवल्यामुळे हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.

प्रकल्पाचे फायदे

नरीमन पॉईंट ते मीरा-भाईंदर हे अंतर केवळ ३० मिनिटांत पार करता येणार.

मुंबई महापालिकेचा कोस्टल रोड उत्तनपर्यंत जाऊन मीरा-भाईंदर व वसई-विरार यांना थेट जोडणी मिळणार.

सुमारे ८ हजार कोटी रुपयांचा खर्च, एल अँड टी कंपनीकडून कामकाज सुरू.

पुढील ३ वर्षांत प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा.

प्रातप सरनाईक यांचे वक्तव्य

“हा प्रकल्प माझ्या मतदारसंघासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. गेल्या ५-७ वर्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर दहिसर-भाईंदर रस्त्यासाठी जागा मिळाली आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यावर मीरा-भाईंदर आणि मुंबई यांच्यातील अंतर कमी होईल आणि लाखो नागरिकांचा प्रवास सुलभ होईल. हा प्रकल्प वसई-विरार आणि मुंबईच्या विकासाला नवी गती देईल.”

हा निर्णय मीरा-भाईंदर आणि वसई-विरार भागासाठी मोठा टप्पा मानला जात असून नागरिकांना वाहतुकीत मोठा दिलासा मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here